जिल्हा विशेष शाखा

जिल्हा विशेष शाखा Officers

About Us

विशेष शाखेचे कार्य:


विशेष शाखा पोलिस अधीक्षकांच्या देखरेखीखाली काम करते. जेव्हा व्हीआयपी/व्हीव्हीआयपी किंवा माननीय उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठी कोणताही दौरा किंवा कार्यक्रम आयोजित केला जातो, तेव्हा प्रोटोकॉलनुसार आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, विशेष शाखा अकोला जिल्ह्यातील व्हीआयपी/व्हीव्हीआयपी/न्यायाधीशांच्या भेटीगाठी आणि सार्वजनिक सभा आणि इतर ठिकाणी आवश्यक तो ताफा, एस्कॉर्ट आणि इतर पोलिस बंदोबस्त पुरवतो.


विशेष शाखा प्रामुख्याने सर्व प्रकारच्या निवडणुका, सण, सार्वजनिक सभा, निदर्शने, धरणे, संप आणि मोर्चा, जे विविध मजूर/कर्मचारी, सामाजिक संस्था किंवा राजकीय पक्षांद्वारे आयोजित केले जातात त्या वेळी काम करते. अकोला जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अशा कार्यक्रमांची माहिती संकलित करणे ही विशेष शाखेची महत्त्वाची जबाबदारी आहे. कोणत्याही पोलीस ठाण्यात किरकोळ घटना घडल्यास व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्या वेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष शाखा आवश्यक त्या सूचना देतात.


अकोला जिल्हा हा जातीय आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील जिल्हा आहे. विशेष शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी अकोला जिल्ह्यातील बेकायदेशीर कारवाया आणि महत्त्वाच्या प्रतिष्ठानांवर बारीक लक्ष ठेवून असतात. पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार, विशेष शाखा वेळोवेळी बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी, पाकिस्तानी आणि इतर परदेशी लोकांना शोधून त्यांना हद्दपार करण्यासाठी विशेष मोहीम राबवते.


पासपोर्ट सेवा:

ही शाखा पासपोर्ट अर्जांमध्ये नमूद केलेल्या माहितीची पडताळणी करते.

पासपोर्टबाबत तपशीलवार माहितीसाठी, कृपया http://passport.nic.in वर लॉग इन करा