Headlines
अकोला पोलीस व्हॉट्सॲप चॅटबॉट!

🚔 अकोला पोलीस दल नागरिकांसाठी घेऊन आले सुलभ आणि जलद संवाद माध्यम -
"अकोला पोलीस व्हॉट्सॲप चॅटबॉट!"🤖
आधुनिक तंत्रज्ञानाचा 🖥️ वापर करत अकोला पोलीस दल आता नागरिक आणि पोलीस यांच्यातील संवाद 🗣️ अधिक सुलभ, जलद आणि सोयीस्कर करण्यासाठी नवीन डिजिटल माध्यम घेऊन आले आहे - अकोला पोलीस व्हॉट्सॲप चॅटबॉट! 🤖
🚨 महत्वाचे वैशिष्टये :-
✅ जिल्हयातील प्रत्येक पोलीस स्टेशनचे संपर्क क्रमांक, ईमेल आयडी, सोशल मिडीया अकाउंट, लोकेशन इत्यादी माहिती.
✅ ई-चालान विषयी माहिती.
✅ पारपत्र (Passport) सेवेविषयी माहिती.
✅ चारित्र्य पडताळणी (Character Verification) विषयी माहिती.
✅ सायबर जनजागृती (Cyber Awareness) संबंधी माहिती.
✅ हरवलेले मोबाइल 📱 तक्रार नोंदणी प्रक्रिया आणि इतर अनेक उपयुक्त गोष्टीची माहिती
👉🏻 चॅटबॉटच्या माध्यमातुन नागरिकांना मिळणार असुन दिवस रात्र, म्हणजेच २४ तास कार्यरत असेल!
Chatbot link 👇🏻
https://wa.link/zgytcp
अकोला पोलीस 🚓
सेवेसाठी सदैव तत्पर 🙏🏼